कोपरगाव – महिला भगिनी आणि पाणी यांचे अत्यंत जवळचे नाते आहे. त्या महिला शहरातील असो वा खेड्यातील त्याला अपवाद नाही. प्रत्येक महिला भगिनींचा पाणी हा चिंतेचा विषय. कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील अनेक गावात उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवत असते. हे चित्र बदलण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत.कोपरगाव शहरासह मतदारसंघातील महिलांची पाण्याची वणवण थांबविणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.
कोपरगाव येथे आमदार आशुतोष काळे यांच्या संपर्क कार्यालयात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला पदाधिकारी यांची निवडी करण्यात आल्या. आमदार काळे यांचा हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
काळे म्हणाले, की महिला भगिनींच्या विचारविनिमयातून ज्यावेळी कुटुंबाच्या सुखदुःखाच्या चर्चा होत असतात त्यावेळी महिला आपल्या अडी-अडचणी देखील एकमेकींना सांगत असतात. महिलाच-महिलांच्या अडीअडचणी समजून घेऊ शकतात. त्यामुळे या अडचणी जोपर्यंत महिलांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येत नाही तोपर्यंत त्या अडचणी सुटणार नाही. त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नूतन पदाधिकारी महिलांनी अशा महिला भगिनींच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावे व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे विचार प्रत्येक महिलांपर्यंत पोहचवावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.
पक्षाची प्रतिमा आणि नेत्याची कामगिरी प्रत्येक घरात पोहचविण्यासाठी मोलाची कामगिरी महिलांच्या मार्फत होत असते. त्यामुळे नूतन पदाधिकारी महिलांनी आपली जबाबदारी ओळखून पक्षासाठी व सामाजिक कार्यासाठी वेळ देवून माता-भगिनींना येत असलेल्या अडचणींची माहिती मिळवून या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करावा व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची विचारधारा महिला वर्गांमध्ये पोहचविण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावे.
यावेळी रेखा जगताप यांची जिल्हा राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस सचिवपदी, स्वप्नजा वाबळे यांची जिल्हा राष्ट्रवादी युवती कॉंग्रेस सचिवपदी व वैशाली आभाळे यांची कोपरगाव तालुका राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
राष्ट्रवादी महिला शहर उपाध्यक्षपदी भाग्यश्री बोरुडे, चंद्रभागा हिंगे, सुषमा पांडे, निता डाके, सविता कापडे, स्नेहल पुणेकर, मनीषा दिक्षित, शन्नो पठाण, छाया फरताळे, कविता जिरे, राष्ट्रवादी महिला शहर सचिवपदी कविता जिरे, बेबीआपा चांद पठाण, शितल वायखिंडे, विमल गायकवाड, पूनम पाटोळे, सारिका मोरस्कर, निर्मला सोनवणे, भारती शिंपी, सरला खालकर, योगिता भांगे, नीरा साळवे, उषा उदावंत, रुपाली कळसकर,
निमा गावित, रत्ना पाठक राष्ट्रवादी महिला शहर संघटकपदी आशा भिंगळे, सुनिता हजारे, पूजा देवळालीकर, बेबी वाकचौरे, मनीषा बागडे, अलका सोनवणे, सोनाली फुलपगारे, शैला देवरे, कविता शिलेदार, मनिषा डाके, राणी गोर्डे, शकुंतला मोरे, जिजाबाई उगले, सुलताना शेख, राष्ट्रवादी शहर युवती कार्याध्यक्षपदी अश्विनी नरोडे, उपाध्यक्षपदी डॉ.वर्षा रोकडे, ज्योती आव्हाड, कावेरी राऊत,सचिवपदी दिक्षा उनवने, निकिता लासुरे, पूनम कदम, उज्वला कोंढरे, अनिता अनिल परदेशी तर संघटकपदी तनया डुबे, वैष्णवी महाजन यांची निवड करण्यात आली आहे.