नेवासा : जिल्ह्यातील बालविवाह सारखे प्रथेचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन आणि स्नेहालय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने “उडान” बालविवाह प्रतिबंधक प्रकल्पाच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा बालविवाह मुक्त करण्याचे ध्येय समोर ठेवून हे अभियान राबविण्यात आहे.
या अभियानातंर्गत जिल्ह्यात “माझे गांव बालविवाह मुक्त गांव” ही मोहीम यशस्वी करण्यासाठी कृतीशील प्रयत्न केले जात आहे यासाठी येत्या १५ ऑगस्ट २०२४ रोजीच्या स्वतंत्र दिनानिमित्त होणाऱ्या प्रत्येक गावातील ग्रामसभेमध्ये “बालविवाह प्रतिबंध ठराव” करण्यासाठी उडान प्रकल्पातंर्गत १३४१ ग्रामपंचायती अंतर्गत असणारे सर्व महसूल १६०२ गावांना आणि अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखीपत्र देऊन विनंती करण्यात आलेली आहे.
प्रशासनानेही याबाबत कोणताही विलंब न करता नगर जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी आणि ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना आदेश करून सर्व गावांमध्ये बालविवाह प्रतिबंधक ठराव करून बालविवाह विषयक जनजागृती घडवून आणण्यासाठीचा पुढाकार घेतला आहे.
ही मोहीम राबवण्यासाठी उडान प्रकल्पाचे मानद संचालक ॲड.बागेश्री जरंडीकरवआणि स्नेहालयचे संचालक हनिफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली उडान प्रकल्पाचे प्रकल्प व्यवस्थापक प्रविण कदम,सोशलवर्कर,शाहिद शेख,सीमा जुनी,पूजा झिने आणि महाराष्ट्र राज्यातून आलेल्या विविध जिल्ह्यातील स्वयंसेवक श्रीतेज घुगे,शिवम गावंडे,प्रदीप ढोरे, समीर खोडके, पियुष भगत,शितल पिठाले,प्रनोती कोपरकर,गौरव मडुर,मंगल मुन्तोडे,आदित्य केदार,गायत्री बडधे यांच्या अथक परिश्रमाने ही मोहीम यशस्वी करण्यासाठी यशस्वी प्रयत्न करत आहे
बालविवाह प्रतिबंध ठराव
विवाहपूर्व ग्रामपंचायत कार्यालयात वधू वराच्या जन्म तारखेचे पुरावे जसे की अधिकृत जन्म प्रमाणपत्र – शाळेतून निर्गम उतारा – शाळेच्या अभिलेख सादर करणे बंधनकारक असेल तसेच वयाचे पुरावे मिळाल्यानंतर ग्राम बालविवाह प्रतिबंध समितीकडून वयाची पडताळणी करून लग्नाची नोंद करण्यात येईल. तसेच गावातीत एखाद्या मुलीचा किंवा मुलाचा विवाह गावात किंवा गावाबाहेर असेल तरीही प्रत्येक विवाहाची गावांत नोंदणी करणे अनिवार्य आहे.आणि आपल्या गावामध्ये बालविवाह होणार नाही यासाठी “माझे गांव, बालविवाह मुक्त गांव” हे अभियान राबविण्याचा ठराव संमत करण्यासाठी स्नेहालय यशस्वी प्रयत्न आहोत.