कोपरगाव – कोपरगाव तालुक्याच्या इतिहासात एकाच पंचवार्षिकमध्ये तीन हजार कोटींचा निधी आजपर्यंत एकाही लोकप्रतिनिधीला आणता आला नाही. संवत्सरला देखील विकासकामांसाठी एकाच पंचवार्षिकमध्ये ४१ कोटींचा निधी आजपर्यंत मिळालेला नाही. मागील विधानसभा निवडणुकीत संवत्सरमध्ये जरी आ. आशुतोष काळेंना विरोधकांपेक्षा कमी मताधिक्य असेल परंतु यावर्षी या मताधिक्यात त्यांनी केलेल्या विकासकामांच्या जोरावर आम्ही आ.आशुतोष काळेंना संवत्सरमध्ये मताधिक्यात नंबर एकवर नेवू, अशी ग्वाही कोल्हे गटाच्या अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे विद्यमान संचालक कचेश्वर रानोडे यांनी दिली.
संवत्सर येथे कोल्हे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी आ.आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. यामध्ये कोल्हेंचे विश्वासू सहकारी अमृत संजीवनी शुगर केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे संचालक कचेश्वर रानोडे यांच्यासह संवत्सर येथील संदीप रानोडे, राहुल रानोडे, सयाजीराव रानोडे, ज्ञानेश्वर रानोडे, बाबासाहेब मगर, छायाबाई आचारी, सुरेश रानोडे, चंद्रकांत कडलग, रामदास सौदागर, इकबाल शेख, रामभाऊ पवार, अनिल शिंदे, अशोकराव जगताप, कुंदन परजणे, जगन्नाथ आचारी, शुभम परजणे, भाऊसाहेब महाले आदी कार्यकर्त्यांचा सामावेश आहे. विरोधी पक्षातील दिग्गज कार्यकर्ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी करंजी येथील संदीप शिंदे, केशव शिंदे, विकास शिंदे, खिर्डी गणेश येथील रामदास रोहोम, आप्पासाहेब रोहोम, सुमित चांदर, सिद्धार्थ थोरात, चंद्रकांत बागुल, विलास लोखंडे आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश प्रवेश केला. त्यामुळे यापुढील काळात विकास करण्यासाठी बळ मिळणार आहे.