नगर – कोतवाली पोलिसांनी केडगाव उपनगरातील भूषणनगर येथून एक लाख रुपयांची सुगंधीत तंबाखून आणि वीस हजार रुपये किमतीचे मावा बनविण्याचे मशिन जप्त केले. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे.
अक्षय बापू रहिंज (वय 28, रा. भूषणनगर, केडगाव), माहरूफ अजिज शेख (वय 22, रा. काझीनगर काटवन खंडोबा, नगर) असे त्यांची नावे आहेत. अधिक माहिती अशी, केडगाव भूषणनगर परिसरात मोठ्या प्रमाणात सुगंधीत तंबाखूचा साठा असल्याची माहिती कोतवालीचे पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली.
त्यानुसार पोलीस पथकाने केडगाव भूषणनगर येथे छापा घालून सुमारे पंधरा पोते सुगंधीत तंबाखू व वीज हजार रुपये किमतीचे मावा बनविण्याचे मशिन असा एक लाख 21 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याबाबत वरील आरोपींविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलीस कर्मचारी शरद गायकवाड, योगेश भिंगारदिवे, भरत इंगळे, सागर पालवे, दीपक रोहकले, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत, तान्हाजी पवार यांच्या पथकाने केली.