अहमदनगर : करोना मृत्यूसंख्या तीनशे पार

जिल्ह्यातील करोनाबाधित रुग्णसंख्येची 23 हजारांकडे वाटचाल

नगर (प्रतिनिधी) – नगर जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्यूदरानेही आता कहर केला आहे. नगर जिल्हा शासकीय रुग्णालयातर्फे घोषित केलेल्या आकडेवारीनुसार हा मृत्यूदर तीनशेपेक्षा अधिक आहे. मात्र, प्रत्यक्षातील आकडेवारी यापेक्षा अधिक असल्याचा दावा आता करण्यात येत आहे. एकट्या नगर शहरातच किमान साडेचारशे करोनाबाधितांवर अंत्यसंस्कार झाले आहेत. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालय कळविते, ती आकडेवारीच संशयास्पद आहे.

नगर जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णसंख्येने आता 22 हजार 704 एवढ्या रुग्णसंख्येचा टप्पा गाठला. त्यात करोनामुक्‍त झालेल्या रुग्णांची संख्या 19 हजार 183 इतकी आहे. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 3 हजार 215 एवढी आहे. दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त दाखविली जाते. मग नगरमध्ये नव्याने बाधित होणाऱ्या रुग्णांना नगरमधील बहुतेक रुग्णालयांत “बेडच उपलब्ध नाहीत’ असे का ऐकावे लागते, हा न सुटणारा प्रश्‍न दररोज निर्माण होत आहे.

शहरातील जवळपास सर्वच कोविड रिकव्हरी सेंटरही रुग्णसंख्येने हाऊस फुल्ल आहेत. मग बरे होऊन जाणाऱ्या रुग्णांच्या बेडवर अनेकांना जागाच कशी मिळत नाही, असाही सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान आज जिल्ह्यात 626 रुग्णांना घरी सोडण्यात आले, तर नव्याने 622 रुग्णांना करोनाची बाधा झाली असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली. नगरमध्ये करोनाबाधित रुग्ण बरे होण्याची ही टक्केवारी 84.49 असल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाने सांगितली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.