नेवासा – आमदार अमोल मिटकरी यांच्या हिंदू देवता व हिंदू समाजातील पुरोहित (ब्राह्मण) यांचेबाबत बेताल व खोटे वक्तव्य करून हिंदू देवतांची बदनामी करून समाजात तेढ व वैमनस्य निर्माण केले.याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याबाबत नेवासा तहसिलदार व पोलीस निरीक्षकांना नेवासा तालुक्यातील ब्राह्मण समाज बांधवांनी निवेदन देऊन आमदार मिटकरी यांचा निषेध केला.
आमदार अमोल मिटकरी, सभा आयोजक आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील व धनंजय मुंडे यांचे विरुद्ध कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे
या निवेदनावर दत्तात्रय जोशी, प्रदीप औटी, नितीन जोशी, ऋषीकेश जोशी, सुधाकर साबळे, मयूर देवचक्के, गुरुप्रसाद देशपांडे, निखिल जोशी, मुकुंद शिंदे, नंदकुमार देशपांडे, अनंत बडवे, भरत बडवे, जयंत देवचक्के लक्ष्मीकांत जोशी, सचिन देशपांडे, स्वानंद कुलकर्णी, स्वप्निल बल्लाळ, रुपेश उपाध्ये, उद्यन सभारंजन, राजेंद्र बोलके, अंकुश लवडकर, लक्ष्मण बडवे, अरुण जोशी, गोपाळ बडवे, रत्नाकर जोशी, श्रीपाद बडवे, प्रदिप कुलकर्णी, पांडुरंग देशपांडे, विकास कुलकर्णी, मनोज देव, अवधूत बडवे, मोहिनीराज बडवे, स्वानंद बडवे, श्रावण रेनीवाल, बाळासाहेब जाधव, किशोर देशपांडे, विश्वनाथ बडवे, सचिन रसाळ आदींच्या सह्या आहेत.