अहमदनगर: यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या

अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या करण्यात आली. पारनेर तालुक्यातील जतेगाव फाट्याजवळील घाटात त्यांच्यावर अज्ञातांनी हल्ला केला. रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली. त्यांना तातडीने अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. जरे यांच्या हत्येने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

रेखा जरे या सोमवारी आपला मुलगा आणि आईसोबत पुण्याहून अहमदनगरकडे येत होत्या. यावेळी पारनेर तालुक्यातील जतेगाव फाट्याजवळील घाटात त्यांच्यावर हल्ला झाला. हल्लेखारांनी तीक्ष्ण शस्त्राने रेखा जरे यांच्यावर वार केले. त्यांना त्वरीत अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा आधीच मृत्यू झाला होता.

रेखा जरे या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या. मात्र नंतर त्यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी यशस्विनी महिला ब्रिगेड ही संघटना स्थापन केली होती. दरम्यान रेखा जरे यांची हत्या नेमकी का केली याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र त्यांच्या हत्येने जिल्हा हादरून गेला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.