कल्याण रस्त्यावरील सीनानदी पूल ते जाधव पेट्रोल पंपापर्यंत रस्त्याची दुरवस्था
नगर (प्रतिनिधी) – नगर-कल्याण रोड येथील सीनानदी पूल ते जाधव पेट्रोल पंप पर्यंत रस्त्याची मोठी दुरवस्था झाल्याने सुभाष लोंढे मित्र मंडळाच्या वतीने खड्डयात झाडे लावून गुलालाची उधळण करीत आंदोलन करण्यात आले.
अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या रस्त्याची तातडीने दुरुस्तीचे काम न झाल्यास येत्या सात दिवसात पुर्वसूचना न देता रास्ता रोको करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे.
यावेळी संतोष शिंदे, योगेश चौधरी, सुरज शिंदे, महेश चव्हाण, छाया नागुल, सुनील अबनावे आदिंसह परिसरातील नागरिक सहभागी झाले होते. सीनानदी पूल ते जाधव पेट्रोल पंप पर्यंत रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे. राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा असून, देखील या रस्त्याकडे दुर्लक्ष होत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत धरून जावे लागत असून, या रस्त्यावर अनेक लहान-मोठे अपघात घडत आहेत.