रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.54 टक्के
आज 632 बाधितांची रुग्णसंख्येत भर
नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 24 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्हा शासकीय रुग्णालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार साधारण एका तासाला एका करोनाबाधिताचा मृत्यू झाल्याचे त्यातून स्पष्ट होते. दरम्यान, आज दिवसभरात 632 करोनाबाधितांची भर पडली आहे.
आज दिवसभरात 778 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 19 हजार 961 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 85.54 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजल्यापासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्ण संख्येत 632 ने वाढ झाली. त्यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3 हजार 45 इतकी झाली आहे, तर जिल्ह्यात बाधितांची संख्या 23 हजार 336 झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 66, अँटिजेन चाचणीत 315 आणि खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 251 रुग्ण बाधित आढळले. यामध्ये मनपा 35, नगर ग्रामीण 2, राहुरी 5, शेवगाव 1, कोपरगाव 8, जामखेड 14, मिलिटरी हॉस्पिटल 1, अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटिजेन चाचणीत आज 315 जण बाधित आढळून आले. यामध्ये मनपा 60, राहाता 40 , पाथर्डी 50, नगर ग्रामीण 18, श्रीरामपूर 13, कॅन्टोन्मेंट 3, नेवासे 42, श्रीगोंदा 6, पारनेर 7, अकोले 18, राहुरी 13, शेवगाव 9, कोपरगाव 10, जामखेड 15 आणि कर्जत 11, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 251 रुग्णांची नोंद एकूण रुग्णसंख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 115, संगमनेर 12, राहाता 24, पाथर्डी 3, नगर ग्रामीण 32, श्रीरामपूर 21, कॅन्टोन्मेंट 6, नेवासे 6, श्रीगोंदा 2, पारनेर 12, अकोले 3, राहुरी 9, शेवगाव 1, कोपरगाव 5, अशा रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, आज 778 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा 299, संगमनेर 95, राहाता 43, पाथर्डी 39, नगर ग्रामीण 53, श्रीरामपूर 31, कॅन्टोन्मेंट 13, नेवासे 23, श्रीगोंदा 24, पारनेर 26, अकोले 19, राहुरी 14, शेवगाव 27, कोपरगाव 40, जामखेड 7, कर्जत 20, मिलिटरी हॉस्पिटल 5, अशा रुग्णांचा समावेश आहे.