नगर (प्रतिनिधी) – जिल्ह्यात आज 224 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 63 हजार 305 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे 96.20 टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजलेपासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्णसंख्येत 197 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या 1 हजार 530 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 68, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 45, आणि अँटिजेन चाचणीत 84 रुग्ण बाधित आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 42, अकोले 1, कर्जत 1, कोपरगाव 6, नगर ग्रामीण 2, नेवासे 6, पारनेर 2, पाथर्डी 5, श्रीगोंदा 1, श्रीरामपूर 2, अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 13, अकोले 2, जामखेड 1, कोपरगाव 1, नगर ग्रामीण 7, नेवासे 1, पारनेर 2, पाथर्डी 2, राहाता 2, राहुरी 1, संगमनेर 11, शेवगाव 1, कॅन्टोन्मेंट 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटिजेन चाचणीत आज 84 जण बाधित आढळून आले. यामध्ये अकोले 3, जामखेड 4, कर्जत 13, कोपरगाव 7, नगर ग्रामीण 7, नेवासे 4, पाथर्डी 11, राहाता 4, राहुरी 7, संगमनेर 9, शेवगाव 9, श्रीगोंदा 4, श्रीरामपूर 2, अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 52, अकोले 18, जामखेड 7, कर्जत 7, कोपरगाव 22, नगर ग्रामीण 8, नेवासे 18, पारनेर 3, पाथर्डी 16, राहाता 13, राहुरी 6, संगमनेर 33, शेवगाव 7, श्रीगोंदा 10, श्रीरामपूर 2, मिलिटरी हॉस्पिटल 1 आणि इतर जिल्हा 1, अशा रुग्णांचा समावेश आहे.
नगर करोना अपडेट्स
बरे झालेली रुग्णसंख्या : 63305
उपचार सुरू असलेले रुग्ण : 1530
जिल्ह्यातील एकूण मृत्यू : 971
एकूण रुग्णसंख्या : 65806