अहमदाबाद- मुंबई तेजस एक्‍स्प्रेसला हिरवा कंदील

अहमदाबाद – अहमदाबादहून मुंबईसाठी तेजस एक्‍स्प्रेस ही आणखी एक नवीन एक्‍स्प्रेस सुरू करण्यात आली असून त्या एक्‍स्प्रेसला आज हिरवा कंदील दाखण्यात आला. मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी हा हिरवा झेंडा दाखवला. या गाडीतील प्रवाशांना आधुनिक सुविधा त्यात देण्यात आल्या आहेत. तेजस एक्‍स्प्रेस ही प्रियीमय दर्जाची रेल्वे गाडी असून पहिली तेजस एक्‍स्प्रेस गेल्या वर्षी दिल्ली-लखनौ मार्गावर सुरू करण्यात आली होती. देशभरात अशा प्रकारच्या दीडशे गाड्या सुरू करण्याचा रेल्वेचा प्रस्ताव आहे.

अहमदाबाद मुंबई तेजस एक्‍सप्रेचा कमर्शिअल रन 19 जानेवारीपासून सुरू होणार आहे. ही एक सेमी हायस्पीड एक्‍स्प्रेस म्हणून गणली जाणारी गाडी असून ती या मार्गावर आठवड्यातून सहा दिवस चालणार आहे. गुरूवारी देखभालीसाठी ही गाडी बंद ठेवली जाणार आहे. 736 प्रवासी क्षमता असलेली ही गाडी पुर्ण वातानुकुलित आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here