Gujarat Accident: गुजरातच्या पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा शहराजवळ शुक्रवारी व्हॅन आणि ट्रक यांच्यात झालेल्या धडकेत पाच जण ठार तर दोन जखमी झाले.
पोलिस अधीक्षक हिमांशू सोळंकी यांनी सांगितले की, गोलाव गावातून जाणाऱ्या राज्य महामार्गावर दुपारी 4.30 वाजता ही घटना घडली, व्हॅन प्रवासी घेऊन गोध्राहून छोटाउदेपूरला जात असताना विरुद्ध दिशेने ट्रक येत होता.
दोन जणांचा जागीच मृत्यू –
ट्रकने व्हॅनला धडक दिल्याने दोन जण जागीच ठार झाले, तर तिघांचा गोध्रा येथील रुग्णालयात मृत्यू झाला, असे एसपींनी सांगितले. पाचही मृत पुरुष आहेत. मृत व जखमी हे छोटेउदेपूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत. अपघाताचा पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.