नवी दिल्ली : कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते अहमद पटेल यांना 400 कोटी रुपयांच्या हवाला प्रकरणात नोटीस जारी करण्यात आली आहे. पटेल यांना आयकर विभागाकडून न्यायलयात हजर राहण्याबाबत समन्स जारी करण्यात आले आहे.
आयकर विभागाच्या विविध कंपन्यांद्वारे कॉंग्रेस पार्टीला पाठविलेल्या 400 कोटी रुपयांहून अधिक हवाला व्यवहारांचा तपास केला जात आहे. यापूर्वी आयकर विभागाने अहमद पटेल यांना 11 फेब्रुवारी रोजी समन्स जारी केले होते आणि 14 फेब्रुवारी रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. मात्र अहमद पटेल 14 फेब्रुवारी रोजी प्रकृती बरी नसल्याने हजर राहून बाजू मांडू शकले नाहीत. त्यांनी सांगितले होते की श्वासाचा त्रास होत असल्याने ते फरीदाबादच्या मेट्रो रुग्णालयात दाखल झाले आहेत.