नवी दिल्ली : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचे आज करोनामुळे निधन झाले आहे. वयाच्या 71 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमद पटेल यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
रामनाथ कोविंद म्हणाले कि, अहमद पटेल यांच्या निधानाने दु:ख. ते एक उत्तम खासदार होते. उत्तम गुण आणि नेतृत्वाचे ते अगदी योग्य उदाहरण होते. त्यांच्या स्वभावामुळे त्यांचे प्रत्येक पक्षात मित्र होते. मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो, असे राष्ट्रपतींनी म्हंटले आहे.
Distressed to know that veteran Congress leader Ahmed Patel is no more. An astute Parliamentarian, Shri Patel combined the skills of a strategist and the charm of a mass leader. His amiability won him friends across party lines. My condolences to his family and friends.
— President of India (@rashtrapatibhvn) November 25, 2020
अहमद पटेल यांनी समाजाच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य अर्पण केले. ते त्यांच्या तल्लख बुद्धीसाठी ओळखले जायचे. काँग्रेसला शक्तीशाली पक्ष म्हणून उभे करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान कायमच लक्षात राहिले. अहमद भाईंच्या आत्म्याला शांती लाभो, असेही नरेंद्र मोदी यांनी म्हंटले आहे.
Saddened by the demise of Ahmed Patel Ji. He spent years in public life, serving society. Known for his sharp mind, his role in strengthening the Congress Party would always be remembered. Spoke to his son Faisal and expressed condolences. May Ahmed Bhai’s soul rest in peace.
— Narendra Modi (@narendramodi) November 25, 2020