लंडन – एखाद्या खेळाडूने 28 चेंडूंमध्ये शतक ठोकले असे म्हटले तर त्यावर विश्वास बसणार नाही. मात्र ही किमया केली आहे. अहमद नबीने युरोपियन क्रिकेट स्पर्धेत. ड्रॅक्स क्लबकडून खेळताना त्याने ही धडाकेबाज खेळी करताना 14 षटकार ठोकले. अवघ्या 28 चेंडूत शतकी खेळी साकारून सर्वात जलद शतक ठोकण्याचा नवा विक्रम केला आहे.
Dreux close on 162 off T10. The highest team score in #ECL19 history on the back of Nabi’s 30 ball century. Chapeau. #MagnifiqueFrance pic.twitter.com/U6GdXYvTPJ
— European Cricket League (@EuropeanCricket) July 30, 2019
नबीच्या 30 चेंडूंमधील नाबाद 105 धावांच्या जोरावर त्याच्या संघाने 10 षटकांत 6 बाद 164 धावांचा डोंगर रचला. त्यास उत्तर देताना क्लाज क्लबने 10 षटकांत 5 बाद 69 धावा केल्या.
टी-10 सामन्यांना जरी आयसीसीची मान्यता नसली तरी या स्वरूपाच्या सामन्यांमध्ये ख्रिस गेल, युवराजसिंगसारखे नामवंत खेळाडू सहभागी झाले असल्यामुळे चाहत्यांमध्ये या सामन्यांची उत्सुकता निर्माण झाली आहे. गेलने 2013 च्या आयपीएलमध्ये 30 चेंडूंत शतक केले होते तर भारताच्या रिद्धीमान साहाने स्थानिक क्लब स्पर्धेत 20 चेंडूंत शतक झळकाविले होते.