नगर (प्रतिनिधी) – नगरकरांसाठी आज पुन्हा एकदा अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. नव्याने बाधित होणार्या रुग्णांची संख्या कालच्यापेक्षा आज पुन्हा कमी झाली. रविवारी (ता. 18) नवीन करोनाबाधितांची संख्या 3 हजार 592 होती. सोमवारी (ता. 19) ती 3 हजार 229 झाली. तसेच आज ती 2 हजार 795 इतकी आहे. त्यामुळे कालच्यापेक्षा आज रुग्णसंख्या आणखी 434 ने कमी झाल्याने धोक्याच्या स्थितीतून बाहेर येण्यास सुरुवात झाल्याचे स्पष्ट होत आहे.
नगर जिल्ह्यात करोनाबाधितांच्या रोज वाढणार्या संख्येने नगरकर अत्यंत भीतीच्या सावटाखाली होते. मात्र, गेल्या तीन दिवसांत रुग्णसंख्या पुन्हा एकदा घटतीकडे जाण्यास सुरुवात झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. जिल्ह्यात येत्या 30 एप्रिलपर्यंत ‘जनता कर्फ्यू’ लावण्यात आलेला आहे. त्यानुसार घोषित करण्यात आलेल्या निर्बंधांचे कडक पद्धतीने पालन झाल्यास पुढील तीन ते चार दिवसांत आणखी समाधानकारक चित्र नगरमध्ये निर्माण होईल, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आज 2 हजार 631 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 1 लाख 19 हजार 241 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 83.88 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्णसंख्येत 2 हजार 795 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 21 हजार 277 इतकी झाली आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 608, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 691 आणि अँटीजेन चाचणीत 1 हजार 496 रुग्ण बाधीत आढळले. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 182, अकोले 01, जामखेड 01, कर्जत 79, कोपरगाव 33, नगर ग्रामीण 20, नेवासा 14, पारनेर 43, पाथर्डी 03, राहाता 13, राहुरी 06, संगमनेर 88, शेवगाव 33, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 82, कँटोन्मेंट बोर्ड 08 आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 230, अकोले 02, जामखेड 01, कर्जत 13, कोपरगाव 34, नगर ग्रामीण 67, नेवासा 18, पारनेर 26, पाथर्डी 12, राहाता 76, राहुरी 29, संगमनेर 27, शेवगाव 18, श्रीगोंदा 21, श्रीरामपूर 53, कँटोन्मेंट बोर्ड 04 आणि इतर जिल्हा जिल्हा 59 आणि इतर राज्य 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
अँटीजेन चाचणीत आज 1 हजार 496 जण बाधित आढळून आले. मनपा 238, अकोले 87, जामखेड 25, कर्जत 68, कोपरगाव 48, नगर ग्रामीण 195, नेवासा 152, पारनेर 76, पाथर्डी 79, राहाता 127, राहुरी 123, संगमनेर 24, शेवगाव 57 श्रीगोंदा 83, श्रीरामपूर 94, कॅन्टोन्मेंट बोर्ड 09 आणि इतर जिल्हा 11 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांमध्ये मनपा 466, अकोले 143, जामखेड 32, कर्जत 162, कोपरगाव 293, नगर ग्रामीण 104, नेवासा 112, पारनेर 118, पाथर्डी 114, राहाता 212, राहुरी 150, संगमनेर 219, शेवगाव 91, श्रीगोंदा 124, श्रीरामपूर 200, कॅन्टोन्मेंट 71, मिलिटरी हॉस्पिटल 07 आणि इतर जिल्हा 13 अशा रुग्णांचा समावेश आहे.