नगर (प्रतिनिधी) – नगर शहर व जिल्ह्यात करोनाबाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. गेल्या चोवीस तासांमध्ये नगर जिल्ह्यात उच्चांकी 611 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर बुधवारी 323 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 77 हजार 925 इतकी झाली आहे.
रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 94.94 टक्के इतके झाले आहे.
दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत 611 ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणार्या रुग्णांची संख्या आता 2 हजार 667 इतकी झाली आहे. जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 338, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 252 आणि अँटीजेन चाचणीत 21 रुग्ण बाधित आढळले.
जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 127, अकोले 15, जामखेड 01, कर्जत 14, कोपरगाव 33, नगर ग्रामीण 17, नेवासा 03, पारनेर 11, पाथर्डी 16, राहाता 28, राहुरी 03, संगमनेर 31, शेवगाव 02, श्रीगोंदा 20, श्रीरामपूर 01, कॅन्टोन्मेंट 14 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.
खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 67, अकोले 10, कर्जत 01, कोपरगाव 40, नगर ग्रामीण 12, नेवासा 01, पारनेर 08, पाथर्डी 01, राहाता 47, राहुरी 04, संगमनेर 44, श्रीगोंदा 01, श्रीरामपूर 11, कँटोन्मेंट 02 आणि इतर जिल्हा 03 अशा रुग्णांचा समावेश आहे. अँटीजेन चाचणीत आज 21 जण बाधित आढळून आले. मनपा 02, नगर ग्रामीण 01, पारनेर 01, पाथर्डी 07, राहाता 08, श्रीरामपूर 01, आणि इतर जिल्हा 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, आज डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णामध्ये
मनपा 102, अकोले 06, जामखेड 01, कर्जत 08, कोपरगाव 18, नगर ग्रामीण 13, नेवासा 07, पारनेर 12, पाथर्डी 04, राहाता 60, राहुरी 17, संगमनेर 42, शेवगाव 06, श्रीगोंदा 03, श्रीरामपूर 07, कॅन्टोन्मेंट 10 आणि इतर जिल्हा 07 अशा रुग्णांचा समावेश आहे.
बरे झालेली रुग्ण संख्या:77925
उपचार सुरू असलेले रूग्ण:2667
जिल्ह्यातील एकूण मृत्यू :1182
एकूण रूग्ण संख्या : 82074