रेडा -राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त इंदापुर शहरातील जुन्या कोर्टासमोर असणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सार्वजनिक बांधकाम, वने व पशुसंवर्धन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, युवक प्रदेश उपाध्यक्ष डॉ. शशिकांत तरंगे, अभियंता वसंतराव माळुंजकर, प्रा. अशोक मखरे, बाळासाहेब ढवळे, माऊली वाघमोडे, राहुल गुंडेकर, प्रवीण हरणावळ, हेमंत वाघमोडे आदी यावेळी उपस्थित होते.