शुभांकरची आगेकूच

पॅरिस: भारताच्या नवोदित शुभांकर डे याने फ्रान्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्या फेरीच्या सामन्यात सहज विजयाची नोंद केली. भारतीय खेळाडूंना या मालिकेतील स्पर्धांमध्ये यंदाच्या मोसमात फारसे यश लाभलेले नाही.

त्याने इंडोनेशियाच्या टॉमी सुगेरीटो याचा 15-21, 21-14 व 21-17 असा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. जागतिक क्रमवारीत 42 व्या स्थानावर असलेल्या शुभांकरने 3 ऱ्या क्रमांकावर असलेल्या सुगीरेटोला या सामन्यात पहिल्या गेमनंतर पुढे आक्रमक खेळाने निष्प्रभ केले.

1 तास 18 मिनिटे चाललेल्या या सामन्यात शुभांकरने व्हॉलीजवळून खेळ करताना वर्चस्व राखले. बीडब्ल्यूएफ सुपर 750 मालिकेतील स्पर्धा आहे.

शुंभाकरला मार्च महिन्यात न्यूझीलंडला झालेल्या स्पर्धेत सुगीरेटोकडूनच पराभवाचा सामना करावा लागला होता, आज त्याने या पराभवाची परतफेड केली.

Leave A Reply

Your email address will not be published.