शेतीमालाच्या निर्यातीसाठी अॅग्रिमा एक्‍झिम सज्ज

भारत देश हा ऍग्रिकल्चर कमोडिटी साठी एक हब आहे, शेतकऱ्यांना मिळणारा हमीभाव आणि शेतीमालाची निर्यात केल्यानंतर होणारा नफा यात जमीन आसमानाचा फरक जाणवतो. याचे कारण एकच ते म्हणजे भारतीय शेतमालाची कमी प्रमाणात होणारी निर्यात हीच परिस्थिती सुधारण्यासाठी ऍग्रिमा एक्‍झिम या कंपनीची स्थापना झाली आहे.

शेतकऱ्याचा मालाला कसा योग्य भाव मिळवू शकेल. कोणत्या देशात माल निर्यात केल्याने त्यांना फायदा होऊ शकतो. याबाबतीत मार्गदर्शन करणे तसेच परदेशातील बाजार पेठेतील मागणीनूसार कोणते पीक घ्यावे व कोणते पीक घेतल्याने त्यांचा नफा होऊ शकतो. याचे मार्गदर्शन व प्रशिक्षण ऍग्रीमा एक्‍झिम द्वारे शेतकऱ्यांना दिले जाते. मालासाठी योग्य जागतिक बाजारपेठ शोधून शेतकऱ्यांना त्याची माहिती करुन देणे मालाची क्‍वालिटी चेक करुन घेणे इत्यादी मध्ये ही ऍग्रीमा एक्‍झिम सतत कार्यरत असते.

याविषयी अधिक माहिती देताना कंपनीचे ग्लोबल मार्केटिंग प्रमुख विकास वाघ म्हणाले, भारताचा जीडीपी वाढावा यासाठी कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. आपण 80 टक्के उत्पादनाच्या बाबतीत शेतीवर अवलंबून असल्याच्या कारणाने आपल्या शेतीमालाची निर्यात जगभर झाली तर आपोआपच आपल्या प्रगतीच्या संधी वाढतील. ऍग्रीमा एक्‍झिम हे स्टार्ट अप इंडिया च्या उपक्रमातील शेतकऱ्यांसाठीचे आम्ही उचललले पाहिले पाऊल आहे. शेतकऱ्यांची जागतिक बाजारपेठेत ओळख प्रस्थापित होणे. आपल्या शेतमालाला बाहेर देशात किंमत मिळणे हे अत्यंत महत्वाचे आहे.

नैसर्गिकरित्या भारत हा सुजलाम्‌ सुफलाम्‌ आहे आणि याचाच फायदा आपल्या शेतीला आणि शेतकऱ्याला डिजिटल जगात करून देणे आपले कर्तव्य आहे. भारत सरकार आपल्या परीने प्रयत्शील असतेच मात्र ऍग्रीमा एक्‍झिम सारख्य कंपन्याच्या प्रयत्नामुळे औद्योगिक क्षेत्रात शेती अग्रगण्य होण्याच्या शर्यतीत सहभागी होते. ऍग्रीमा एक्‍झिम हे भारतीय कृषी क्षेत्रातील परिवर्तनाचे नवे नाव आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.