Prithviraj Chavan : नुकत्याच पार पडलेल्या दावोस दौऱ्यात देश विदेशातील विविध कंपन्यांनी महाराष्ट्रात गूंतवणूक करण्यासाठी लाखो कोटींचे करार केले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ३० लाख कोटींचे एमओयू (MoU) वर स्वाक्षरी केली. या करारामुळे महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे. या करारातून मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होणार आहेत. अशातच दावोस कराराबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाष्य केले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत काही सवाल उपस्थित केले आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटींचे MoU झाले असतील, तर आंनदाची बाब आहे. राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यक आहे. पण मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. कारण सत्य शेवटी बाहेर येतेच, अशा शब्दांत पृथ्वीराज चव्हाण यांनी टीकास्त्र डागले आहे. हेही वाचा : Pimpri : महापौर, उपमहापौर पद निवडणुकीसाठी ‘या’ दिवशी विशेष सभा माजी मुख्यमंत्री पृथ्वाराज चव्हाण यांनी एक्सवरून ट्वीट करत अनेक सवाल उपस्थित केले आहेत. मागील दाव्होस दौऱ्यातील MoU पैकी महाराष्ट्रात किती उद्योग सुरू झाले? किती गुंतवणूक झाली? प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झाले? मोठे आकडे नव्हे, तर प्रत्यक्ष गुंतवणूक व त्यातून होणारी रोजगारनिर्मिती महत्त्वाची आहे, असे देखील चव्हाण यांनी म्हटले आहे. आपल्याच राज्यातील कंपन्यावरोबर दावोस मध्ये MoU करण्याबद्दल कर्नाटक सरकारच्या उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे निरीक्षण महत्वाचे आहे. ते म्हणतात कि आम्ही दावोससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर कर्नाटक किंवा भारतीय कंपन्यांशी MoU करत नाही तर फक्त परकीय गुंतवणुकदारांशी करार करतो. म्हणूनच कर्नाटकात परकीय उद्योग येतात आणि कर्नाटकाचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा तास्त आहे, अशी महत्वाची माहिती चव्हाण यांनी ट्वीटमधून सांगितली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्होस दौऱ्यावर टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटींचे MoU झाले असतील, तर आंनदाची बाब आहे. राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यक आहे. पण मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. कारण सत्य शेवटी बाहेर येतेच. मागील… — Prithviraj Chavan (@prithvrj) January 24, 2026 अडाणी आणी लोढा यांच्या सारख्या स्थानिक कंपन्याबरोबर दावोसमध्ये करार करणे हा एक क्रूर विनोद आहे, असा खोचक टोलाही चव्हाण यांनी लगावला आहे. महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांना इव्हेंट नकोत तर पारदर्शकता, उत्तरदायित्व व प्रत्यक्ष रोजगार हवे आहेत. आत्तापर्यंतच्या दावोस मध्ये घोषणा केलेल्या MoU वर आणि त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात किती मोठे परकीय उद्योग सुरू झाले यावर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का? असा सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : Malthan : दोन दिग्गज उमेदवार रिंगणात; खडकी गटाची लढत जिल्ह्यात लक्षवेधी