भारत-चीन सीमेवरील तणाव कमी होणार !

नवी दिल्ली – भारत आणि चीनच्या वरिष्ठ लष्करी कमांडर अधिकाऱ्यांदरम्यान चुशूल येथे, बैठकीची सातवी फेरी झाली. यावेळी, भारत-चीन सीमाभागाच्या पश्‍चिम क्षेत्रात, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरच्या तणावावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी अत्यंत प्रामाणिक, सखोल आणि विधायक चर्चा झाली.

ही चर्चा अत्यंत सकारात्मक, विधायक स्वरुपाची होती आणि यावेळी, दोन्ही बाजूंनी परस्परांची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न केला.

लष्करी आणि राजनैतिक मार्गांनी दोन्ही देशांमधला संवाद आणि संपर्क सुरूच ठेवण्याबाबत, तसेच लवकरात लवकर, सीमेवरचा तणाव निवळण्यासाठी एक सर्वमान्य तोडगा काढण्याबाबत, उभय बाजूने सहमती व्यक्त करण्यात आली.

दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये ज्या ज्या मुद्यांवर सहमती झाली आहे, अशा सर्व निर्णयांची त्वरित अंमलबजावणी करण्यावरही दोन्ही बाजूंनी सहमती व्यक्त केली. मतभेदांचे रुपांतर वादात होऊ न देण्यासाठी आणि सीमाभागातील शांतता सुरक्षित राखण्यासाठी एकत्रितपणे प्रयत्न करण्यावर या बैठकीत भर देण्यात आला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.