आग्रा – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंम्प हे सोमवारपासून दोन दिवसीय भारत दौऱ्यावर येणार आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या स्वागतासाठी सध्या सर्वत्र जोरदार तयारी सुरु असून आपल्या नियोजित दौऱ्यात ते देशातील महत्वाच्या ठिकाणी भेटी देणार आहेत.
दरम्यान, डोनाल्ड ट्रंम्प हे आपल्या भारत दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी आग्रा येथील जगप्रसिद्ध ताजमहालास भेट देणार आहेत. ट्रंम्प यांच्या स्वागतासाठी आग्रा शहरामध्ये विशेष तयारी करण्यात आल्याची माहिती शहराचे महापौर नवीन जैन यांनी दिली असून यावेळी ट्रंम्प याना एक खास भेटवस्तू देखील दिली जाणार आहे.
डोनाल्ड ट्रंम्प यांच्या आगमनानंतर त्यांना भेटवस्तू म्हणून ६०० ग्रॅम वजनाची चांदीची चावी देण्यात येणार आहे. या चांदीच्या चावीद्वारे, ‘आग्रा शहर आपलं खुल्या मनानं स्वागत करत आहे’ असा प्रतीकात्मक संदेश देण्यात येणार आहे.
Agra Mayor Naveen Jain: We will hand over a silver key weighing 600 grams to US President Donald Trump upon his arrival in the city on Feb 24. The concept behind greeting guests with a key is to symbolically convey a message that they are welcome to unlock gates & enter Agra. pic.twitter.com/6JhHZ1qvJn
— ANI UP (@ANINewsUP) February 22, 2020
अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजप ‘या’ मुद्द्यांवरून करू शकतं शिवसेनेची कोंडी