अग्नितांडव काही थांबेना! गुजरातमध्ये कोविड सेंटरमध्ये भीषण आग; 12 रुग्णांचा होरपळून मृत्यू

भरुच : गुजरातमधील भरुच येथील एका कोविड केअर सेंटरला भीषण आग लागली. या आगीच्या दुर्घटनेत 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. येथील पटेल वेलफेअर रुग्णालयात असलेल्या कोविड केअर सेंटरला रात्री 12.30 च्या सुमारास ही आग लागून ही दुर्घटना घडली.

भरुच जिल्ह्यातील पटेल वेलफेअर रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर बनवण्यात आलं होतं. तिथेच रात्रीच्या सुमारास मोठी आग लागली. आग लागल्यामुळे कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या रुग्णांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं. परंतु आग एवढी भीषण होती की त्यात 12 जणांचा मृत्यू झाला.

आगीत होरपळून सुमारे 12 जणांचा मृत्यू झाला. परंतु आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान पोलीस प्रशासन घटनास्थळी हजर आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.