भिवंडी – येथील रंग कामासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रश कंपनीच्या गोदामाला भीषण आग लागली. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना हरिहर कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या रंग कामासाठी वापरल्या जाणाऱ्या ब्रश कंपनीच्या गोदामा आज ( शुक्रवारी) सकाळी घडली आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
दरम्यान, या गोदामाला भीषण आग लागली असून आगीचे कारण अजून समजू शकले नाही. आगीच्या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.