kutimb

राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून चंद्रकांत पाटील यांना ‘अग्निपंख’ भेट

पुणे – काल एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भारताचे दिवंगत राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए. पी. जे अब्दुल कलाम यांच्या विषयी चुकीचा संदर्भ दिला होता. चंद्रकांत पाटील यांना दिवंगत राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या विषयी खरी माहिती मिळावी यासाठी त्यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने “अग्निपंख” हे कलाम साहेबांचे आत्मचरित्र त्यांच्या स्विय सहायकांकडे भेट देण्यात आले.

चंद्रकांत दादांनी ते आत्मचरित्र नक्की वाचावे आणि खरा इतिहास माहीत करुन घ्यावा, असे सांगण्यात आले. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राकेश कामठे, शहराध्यक्ष महेश हांडे, कोथरूड युवक अध्यक्ष प्रमोद शिंदे, उपाध्यक्ष राकेश मारणे, शिवाजीनगर अध्यक्ष अविनाश भांड, धनंजय केळकर, आशिष शिंदे, लखन सैदगर, राम सरवदे, रितेश घडसिंग, प्रतीक गायकवाड उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.