‘मी गरीब रुग्ण, मला उपचारांसाठी बेड मिळेल का?’

भीम छावा संघटनेचे धर्मादाय कार्यालयासमोर आंदोलन 

येरवडा – धर्मादाय आयुक्त कार्यालय अंतर्गत शहरातील अनेक हॉस्पिटल येतात. येथे शासकीय नियमांनुसार गरीब, निर्धन आणि आर्थिक दुर्बल घटकांतील रुग्णांना मोफत उपचार करणे बंधनकारक आहे; परंतु काही हॉस्पिटल्स करोनाचे कारण पुढे करून अशा रुग्णांना दाखल करून घेण्यास नकार देत आहेत. याविरोधात भीम छावा संघटनेने रुग्णासह धर्मादाय कार्यालयासमोर आंदोलन केले. 

संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, सोनाली सोनवणे यांना मेंदूच्या विकारासाठी गेले महिनाभर एका खासगी हॉस्पिटलमध्ये विनंती करूनही दाखल करून घेतले नाही. या हॉस्पिटलवर नियमांनुसार कारवाई करावी. “मी गरीब रुग्ण, मला बेड मिळेल का?’ या आशयाचे फलक घेऊन रुग्णासह हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनाचे नेतृत्व अध्यक्ष शाम गायकवाड यांनी केले. यावेळी नीलेश गायकवाड, नरेश माडणूर, विशाल कांबळे, मंगेश कांबळे आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.