‘झी मराठी पुरस्कार सोहळ्या’त ‘अग्गंबाई सासूबाई’चा बोलबाला

मुंबई : झी मराठी वाहिनीवरील कलाकारांचा गौरव करणारा झी मराठी पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही पुरस्कार सोहळ्यात नव्याने सहभागी झालेल्या मालिकेची चर्चा पाहायला मिळाली. गेल्या वर्षी तुला पाहते रे या मालिकेने सर्वाधिक पुरस्कार पटकावले होते. तर यावर्षी अवघ्या तीन महिन्यांपूर्वी सुरु झालेल्या ‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेचाच बोलबाला पहायला मिळाला. या मालिकेने एकूण नऊ पुरस्कार पटकावले. त्यापाठोपाठ ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेने सहा पुरस्कारांवर आपले नाव कोरले.

‘अग्गंबाई सासूबाई’ या मालिकेत गिरीश ओक, निवेदिता सराफ, रवी पटवर्धन, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की हे कलाकार मुख्य भूमिकेत आहेत. तर दुसरीकडे कथेत येणाऱ्या नवनवीन वळणांमुळे ‘रात्रीस खेळ चाले’ ही मालिकासुद्धा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. अण्णा, वच्छी, शेवंता भूमिकांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे यंदाच्या ‘झी मराठी पुरस्कार सोहळ्या’त या दोन मालिकांचाच बोलबाला पाहायला मिळाला.

‘अग्गंबाई सासूबाई’ला मिळालेले पुरस्कार-
सर्वोत्कृष्ट सासू- आसावरी
सर्वोत्कृष्ट सून- आसावरी
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (स्त्री)- मॅडी
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत
सर्वोत्कृष्ट सासरे- आजोबा
सर्वोत्कृष्ट कुटुंब- कुलकर्णी कुटुंब
सर्वोत्कृष्ट मालिका
सर्वोत्कृष्ट जोडी- अभिजीत-आसावरी
सर्वोत्कृष्ट आई- आसावरी

‘रात्रीस खेळ चाले’ ला मिळालेले पुरस्कार-
सर्वोत्कृष्ट खलनायिका- वच्छी
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (स्त्री)- शेवंता
सर्वोत्कृष्ट खलनायक- अण्णा नाईक
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (पुरुष)- अण्णा नाईक
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (स्त्री)- छाया
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष)- चोंट्या

Leave A Reply

Your email address will not be published.