सलमान खानविरोधातील तक्रार मागे

पुणे – प्रसिध्द अभिनेते सलमान खान यांच्याविरोधात बिग बॉस सिझन 11 मध्ये कलर्स या वाहिणीवर प्रक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमात शिवीगाळ केल्याप्रकरणात अभिनेता झुबेर खान यांनी वडगाव मावळ न्यायालयात दाखल केलेली तक्रार मागे घेतली आहे. त्या तक्रारीच्याविरोधात सलमान खान यांनी शिवाजीनगर येथील न्यायालयात दाखल केलेली रिव्हिजनही मागे घेतली आहे.

झुबेर खान यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार वडगाव मावळ येथील न्यायालयाने सलमान खान यांना भारतीय दंड संहिता कलम 504 आणि 506 अन्वये इन्शु प्रोसिस केली होती. खटल्यासाठी न्यायालयत हजर राहण्याचा आदेश दिला होता. या विरोधात सलमान यांनी ऍड. सुनीता बन्सल आणि ऍड. नितीश चोरबेले यांच्यामार्फत शिवाजीनगर येथील सत्र न्यायालयात रिव्हिजन केले. यावर सुनावणी करत येथील न्यायालयाने वडगाव मावळ न्यायालयाने दिलेल्या आदेशाला स्थगिती दिली.

सलमान यांना न्यायालयात हजर न राहण्यास मुभा दिली. त्यानंतर झुबेर यांनी स्वत:हून वडगाव मावळ न्यायालयातील तक्रार काढून घेतली. त्यानंतर सलमान यांनी शिवाजीनगर न्यायालयात दाखल केलेले रिव्हिजन काढून घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.