मुंबई – मराठी चित्रपटसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणार अभिनेता ‘स्वप्नील जोशी’ आपल्या चाहत्यांसाठी नेहमीच काहीतरी नवीन गोष्टी घेऊन येत असतो. स्वप्नील सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतो. तो सतत आपल्या आगामी प्रोजेक्ट बद्दल फॅन्सला सांगत राहतो.
View this post on Instagram
दरम्यान, स्वप्नील जोशी याने नुकतंच आपल्या इंस्टाग्रावर एक फोटो शेअर केला आहे. त्याचा हा लूक अनेकांना संभ्रमात पडणारा असून, अवघ्या काही तासांतच त्याचा फोटो तुफान व्हायरल झाला आहे. शेअर केलेल्या या फोटोमध्ये स्वप्निल स्त्री वेशात दिसत आहे. त्याने सुंदर गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. आता हा स्त्री वेश कशासाठी तर ‘तेरे घरच्या समोर’च्या आठवणीत.
View this post on Instagram
‘तेरे घरच्या समोर’ या मालिकेत स्वप्निल जोशी एका आगळ्यावेगळ्या रूपात दिसला होता. या मालिकेत स्वप्नीलने स्त्री पात्र साकारले होते. या भूमिकेची आठवण त्याने यावेळी शेअर केली.
View this post on Instagram
स्वप्नीलने या फोटोला एक कॅप्शन सुद्धा दिले आहे. “तेरे घरच्या समोर” ही मालिका करताना दिग्गज कलाकारांकडून बरंच काही शिकता आलं. हा अनुभव मला समृद्ध करून गेलाय. स्त्री भूमिका साकारणं, “ती” होणं खरंच सोपं नाही. “ती” जखमांच गोंदण मिरवणारी सक्षम सखी आहे. जी स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द उराशी बाळगून आहे. अश्या प्रत्येक “ती”च स्वप्न पूर्ण करायला shop with ti तयार आहे.”
View this post on Instagram