मुंबई – राष्ट्रवादीच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे या नेहमी राजकीय मुद्यावरून चर्चेत असतात, मात्र यावेळी सुप्रिया सुळे त्यांना त्यांच्या आवडत्या वेबसीरिजवरून चर्चेत आल्या आहे. नुकतीच त्यांनी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली या मुलाखतीत सुळे यांनी आवडत्या हिरो आणि वेबसीरिज मनमोकळ्या गप्पा केल्या आहे.
त्या म्हणाल्या, मिर्झापूर ही माझी आवडती वेबसीरिज आहे. मी ही सिरीज पाहिल्यानंतर ( कालिन भैय्या )पंकज त्रिपाठींना फोन केला. मला अनुप्रिया पटेल यांनी मला त्यांचा नंबर दिला. मी त्यांची फॅन असल्याचं त्यांनी सांगितलं.
या कॉल वेळी मला पंकज त्रिपाठी मला म्हणाले,’मी बारामती, सातारा, फलटण या भागात फिरलो आहे. मी बराच वेळ त्यांच्या सोबत बोलले.’ असेही त्यांनी सांगितले. एक नेता नव्हे, तर सुप्रिया सुळे यांच्यातली चाहती आनंदानं हुरळून गेली होती. आपल्या आयुष्यात हा Fan Moment होता, असंही त्या म्हणाल्या. दरम्यान, त्यांनी ‘अमर अकबर अॅंथोनी’ हा चित्रपटही त्यांच्या आवडीचा असल्याचेही सांगितले.