पुणे – भारतातील आघाडीची इंटिग्रेटेड ट्रॅव्हल एजन्सी असलेल्या थॉमस कुक इंडियासाठी पुणे सोर्स मार्केट ठरले आहे. लॉकडाऊनमुळे आलेला थकवा आणि प्रचंड वाढलेल्या मागणीमुळे पुणेकरांमध्ये पर्यटनाची प्रचंड इच्छा असल्याचे दिसून येत आहे. जून 2021 मध्ये पुन्हा सर्व काही खुले झाल्यापासून दर महिन्याला पर्यटनामध्ये 70% वाढ होताना दिसत आहे. आगामी उत्सवांचा हंगाम व हिवाळा, एक्स्पो दुबई 2020 आणि हनिमूनसाठी होणारे पर्यटन हे घटक पुण्यातील पर्यटन वाढीसाठी कारणीभूत ठरले आहेत.
थॉमस कुक इंडियाच्या अहवालानुसार कोव्हिडपूर्व पर्यटन प्रमाणाच्या सध्या 55% मागणी आहे. यात स्थानिक पर्यटनाच्या मागणीत 300% वाढ झाली आहे तर परदेशी पर्यटनामध्ये 50% वाढ झाली आहे. (सप्टेंबर 2021 वि. सप्टेंबर 2019 आकडेवारी संकलन). मालदिव्ह्ज, स्वित्झर्लंड, फ्रान्स, रशिया, तुर्की आणि इजिप्त या देशांमधील पर्यटनाला जास्त मागणी आहे आणि एक्स्पो 2020 दुबईलाही सध्या वाढती मागणी दिसून येत आहे. त्याचप्रमाणे शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्यांची संख्या पुण्यातून वाढताना दिसत आहे आणि क्वारंटाइन पॅकेजेससह थॉमस कुक इंडियाने अमेरिका व कॅनडाला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवासासाठी उत्तम प्रकारे सेवा दिली आहे.
थॉमस कुक इंडियाच्या भारतातील विस्तृत जाळ्यामध्ये पुण्यातील 4 मालकीची / फ्रान्चायझी आउटलेट्स (भांडारकर रोड, पुणे कॅम्प, विमाननगर आणि औंध) आणि महाराष्ट्रात मुंबई व पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नागपूर आणि अहमदनगर या महत्त्वाच्या टिअर 2-3 शहरांमध्ये एकूण 25 आउटलेट्स आहेत.
पुण्यातील पर्यटन ट्रेंड:
थॉमस कुक इंडियाच्या सर्वेक्षणात पुण्यातील ग्राहकांचे वर्तन आणि प्रवासाबाबतचा ट्रेंड याबद्दल सूक्ष्म निरीक्षणे नोंदविली आहेत.
पर्यटनाची वाढती मागणी :
या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 77% व्यक्तींना 2021 या वर्षातच पर्यटन करण्याची इच्छा आहे
स्थानिक-आंतरराष्ट्रीय मिक्स आणि लोकप्रिय ठिकाणे :
62% व्यक्तींनी परदेशी ठिकाणांना पसंत केले आहे; मालदिव्ह्ज, दुबई, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स या ठिकाणांना प्राधान्य देण्यात येत आहे.
78% व्यक्तींनी स्थानिक पर्यटनाला प्राधान्य दिले आहे; काश्मीर, लेह-लडाख, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड; तसेच ईशान्य भारत, राजस्थान आणि अंदमानसाठी वाढती मागणी दिसून येत आहे.
(आकडेवारी बरोबर असण्याचे प्रमाण 100% नाही कारण ग्राहकांनी अनके पर्यायांना पसंती दर्शविली)
सर्वाधिक पसंती :
पुणेकरांना लडाख, काश्मीर, राजस्थान, दक्षिण भारतात बाइकिंगसारख्या आउटडोअर अॅडव्हेंचर सहली आवडतात; डोंगराळ प्रदेशातील ठिकाणे आणि एटीव्ही राइड्स/अॅपल ऑर्चर्डमध्ये पिकनिक लंच; अंदमान व समुद्रकिनाऱ्यावारील ठिकाणे व तेथील सी कार्टिंग, स्नॉर्केलिंग इ. अॅक्टिव्हिज त्यांना आवडतात. स्वित्झर्लंड व फ्रान्समध्ये ख्रिसमस मार्केटच्या उत्सवांसह हिवाळी पर्यटन किंवा रशियातील लॅपलँड व नॉर्दर्न लाइट्स, नाइल क्रुझ, कप्पाडोसियामध्ये (तुर्की) हॉट एअर बलुनिंग आणि एक्स्पो दुबई 2020 ही आघाडीची लोकप्रिय ठिकाणे आहेत.
मागणीला चालना देणारे महत्त्वाचे सेगमेंट्स : कुटुंबे, मिलेनिअल्स/ तरुण प्रोफेशनल्स, हमिनूनर्स, बिझनेस आणि बी-लिझर्स, विद्यार्थी आणि आध्यात्मिक पर्यटन.
पर्यटन सोबती : पुण्यातील ग्राहकांना कुटुंबासमवेत किंवा अनेक पिढ्यांचा समावेश असलेला परिवार (50%); मित्रमंडळी/सहकारी (20%); जोडपी (25%); एकल (5%) पर्यटन करणे आवडते.
एक्स्पो 2020 दुबई 2021 च्या चौथ्या तिमाहीसाठी उत्प्रेरक ठरत आहे आणि मागणीचा वेग वाढविण्यासाठी, अधिकृत तिकीट पुनर्विक्रेता (भारत) म्हणून थॉमस कुक इंडियाने खास डील्स लाँच केल्या आहेत : रु.52,000 (विमानप्रवासासहीत पर्यटन) आणि रु. 28,000 (विमानप्रवास वगळून).
उत्सवांसाठी खास ऑफर्स :
थॉमस कुक इंडियाने, एक खरेदी करा एक मोफत मिळवा म्हणजे भारतातील व परदेशातील निवडक ठिकाणी कम्पॅनिअनला (सोबत असलेली व्यक्ती) मोफत पर्यटन; निवडक युरोप सहलींसाठी प्रति कुटुंब रु.60,000 ची अर्ली बर्ड ऑफर; इंडिया एक्स्ट्राव्हॅगेन्झा हॉलिडेज – या व्यापक पर्यटनासाठी असलेल्या सुमारे 10 दिवसांच्या पॅकेजवर रु.10,000 मूल्याची ताज व्हाउचर्स अशा आकर्षक योजना जाहीर केल्या आङेत.
थॉमस कुकच्या (इंडिया) हॉलिडेज, माइस, व्हिसा विभागांचे अध्यक्ष व कंट्री हेड श्री. राजीव काळे म्हणाले, “पुणे ही आमची एक सर्वोत्तम कामगिरी करणारी बाजारपेठ आहे आणि आमच्या आंतरराष्ट्रीय व स्थानिक पर्यटन व्यवसायामध्ये या शहराचा मोठा वाटा आहे.
या वर्षी भारतातांतर्गत पर्यटनासाठी आम्हाला मागणी वाढलेली दिसून येत आहे. पुणेकर हिमाचल प्रदेश, लेह-लडाख, उत्तराखंड व ईशान्य भारतासारख्या डोंगराळ प्रदेशांना पसंती देत आहेत; आमच्या बाइक ट्रिप्सना खूप मागणी आहे.
पुणेकरांमध्ये मालदिव्ह्ज लोकप्रिय आहे, त्याचप्रमाणे युरोप, तुर्की आणि एक्स्पो 2020 दुबईलाही कुटुंबे आणि बिझनेस/व्यापार असोसिएशन्सनी पसंती दर्शविली आहे.
नवरात्री व दसऱ्यासाठी आमच्या फेस्टिव्ह हॉलिडेजवर खास ऑफर्स आणि डिस्काउंट्स जाहीर करताना मी अत्यंत उत्साहात आहे. पुणेकरांना आमच्या शाखांना भेट द्यावी आणि या उत्सवांच्या हंगामात आणि आगामी हिवाळ्यात आपल्या कुटुंबासह आणि मित्रपरिवाहासह संस्मरणीय सहलीची योजना आखावी यासाठी मी व्यक्तिशः पुणेकरांना आमंत्रण देत आहे.”
ते पुढे म्हणाले, “आमची सर्व पॅकेजेस/सहली ट्रॅव्हशिल्ड अपोलो क्लिनिक्सच्या सहयोगाने सर्वसमावेशक सुरक्षा प्रतिबद्धता व खात्रीलायक सुरक्षित प्रवास कार्यक्रमाने युक्त आहेत :
लस घेतलेले पर्यटन सल्लागार व संपर्करहीत बुकिंग्ज, मोफत रि-शेड्युलिंग व कॅन्सलेशन, कोव्हिड विमा संरक्षण, कॉलवर 24/7 डॉक्टर उपलब्ध, लसीकरण झालेले/कोव्हिड निगेटिव्ह सहप्रवासी, कोव्हिड निगेटिव्ह/लस घेतलेले वाहनचालक, हॉटेल कर्मचारी, सॅनिटाइझ केलेल्या खोल्या आणि वाहने.”