उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ आवाहनानंतर शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय

मुंबई – राज्यातील करोनाचे प्रमाण पुन्हा लक्षणीयरित्या वाढत आहे ही काळजीची बाब असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. त्यामुळे हे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी यापुढील काळात सार्वजनिक स्वरूपातील राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोठा निर्णय घेतला.

शरद पवार म्हणाले कि, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर तसेच माननीय मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी केलेल्या आवाहनानंतर मी माझे सर्व नियोजित सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यात करोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता पुन्हा लॉकडाऊन होणार काय असा प्रश्‍न सर्वत्र विचारला जात आहे. त्या संबंधात आज स्वता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच स्पष्टीकरण दिले असून त्यांनी म्हटले आहे की नागरीकांनीच करोनाच्या संबंधातील निर्बंध काटेकोरपणे पाळावेत. नागरीकांच्या प्रतिसादाचा पुढील आठ दिवस अभ्यास करून लॉकडाऊन विषयीचा निर्णय घेतला जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

छगन भुजबळ यांना करोनाची लागण 

राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिकचे पालिकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. छगन भुजबळ यांनी स्वत: ट्विट करून आपली कोराना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली आहे. तसचे संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.