नवी दिल्ली : देशातील उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाब या पाच राज्यांमधल्या निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत. यामध्ये पंजाब सोडून बाकीच्या चार राज्यांमध्ये भाजपाला मोठं यश मिळाले आहे. त्यामुळे देशभरातल्या भाजपा कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. दरम्यान, या निकालानंतरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईची भेट घेतली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल रात्री आपल्या आई हिराबा यांची त्यांच्या अहमदाबाद इथल्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पंतप्रधान सध्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी आपल्या आईची भेट घेतली. करोना प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे पंतप्रधान त्यांच्या आईला भेटले नव्हते. काल रात्री दोन वर्षांनंतर पंतप्रधान मोदी आपल्या आईला भेटले.
Gujarat: Prime Minister Narendra Modi meets his mother Heeraben Modi at her residence, in Gandhinagar pic.twitter.com/4CvlnsPQtm
— ANI (@ANI) March 11, 2022
रात्री ९ च्या सुमारास पंतप्रधान मोदी आपली सर्व कामे संपवून घरी गेले. त्यावेळी मोदी यांनी आपल्या आईचे आशिर्वाद घेतले आणि त्यांच्यासोबत जेवणही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईला भेटायला गेल्यानंतर त्यांना पाहण्यासाठी आसपासच्या लोकांनी गर्दी केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपले लहान भाऊ पंकज मोदी यांच्या गांधीनगर जवळच्या रायसन भागातल्या निवासस्थानी भेट दिली. पंतप्रधान मोदी यांच्या आई हिराबा या सध्या याच ठिकाणी राहतात.