नवीन 1190 रुग्णांची भर : 21 जणांचा मृत्यू
पिंपरी – गेले दोन दिवस रुग्णसंख्या एक हजारपेक्षा कमी होती. मात्र आज पुन्हा रुग्णसंख्या हजारीपार झाली आहे. आज पुन्हा 1190 नवीन रुग्णांची भर शहरामध्ये पडली आहे. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 66483 इतकी झाली आहे.
प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार आज चार वाजेपर्यंत शहरातील 1104 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. तर शहराबाहेरील 86 रुग्णांना करोनाची लागण झाली. तसेच 24 तासांमध्ये 21 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामध्ये शहरातील 12 व शहराबाहेरील 9 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत शहरात 66483 रुग्णांची नोंद झाली आहे. शहरातील महापालिकेचे रुग्णालय व कोविड केअर सेंटरमध्ये करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सद्यःस्थितीत शहरात 75119 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामध्ये शहराबाहेरील 1104 रुग्णांचाही समावेश आहे.
बुधवारी दिवसभरात शहरात 21 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला. शहरातील चिंचवड, चिखली, कोकणेनगर, सांगवी, तळवडे, पिंपरी, संत तुकारामनगर, भोसरी, दापोडी येथील 12 रुग्णांचा मृत्यू झाला. तर शहराबाहेरील खेड, मारुंजी, जुन्नर, लोहगाव, कात्रज, मावळ, आंबेगाव, चाकण, कुरकुंडी येथील 9 रुग्णांचा समावेश आहे.
दिवसभरात 1071 रुग्णांना घरी सोडण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 55853 इतकी झाली आहे. तर दिवसभरात 3202 संशयित रुग्णांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. काही जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. 2679 रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.