न्यूयॉर्क : जगात कोरोनानंतर सर्वच क्षेत्रात आर्थिक मंदी मोठ्या प्रमाणात आली असल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर जगभरातील अनेक कंपन्यांनी नोकरकपात करत यातून सावरण्याचा प्रयत्न केला. जगातील दिग्गज कंपन्यांकडून करण्यात आलेली नोकारकपातीच्या यादीत आता आणखी एका कंपनीचे नाव समाविष्ट झाले आहे. Disney या कंपनीने देखील कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Disney या कंपनीने तब्बल 7 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे सीईओ बॉब इगर यांनी याबाबतची महत्वाची घोषणा केली आहे. आर्थिक मंदीचा फटका बसलेल्या जगभरातील अनेक तंत्रज्ञान कंपन्यांनी नोकरकपातीचा सपाटा सुरु केला आहे. ट्विटर, मेटा, ॲमेझॉन, गुगल या मोठ्या कंपन्यांनी देखील मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केली आहे. यानंतर आता Disney या कंपनीनं देखील 7 हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.
कंपनीचे सीईओ बॉब इगर यांनी या निर्णयाची घोषणा करताना, “जगभरातील आमच्या कर्मचार्यांबद्दल आम्हाला खूप आदर आणि कौतुक असल्याचे म्हटले आहे. डिसेंबर 2022 मध्ये सीईओ म्हणून पदभार स्वीकारणाऱ्या बॉब इगर यांच्यासमोर नवीन आव्हाने आहेत. मंदीचा मोठा फटका कंपनीला बसत आहे. त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी कंपनीनं कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णाय घेतला आहे. इतर अनेक मोठ्या कंपन्यांनी देखील कर्मचाऱ्यांना कामावरुन कमी केले आहे.
आर्थिक मंदीमुळे अनेक मोठ्या कंपन्या संकटात सापडल्या आहेत. गुगलने देखील मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. गुगलने जवळपास 12 हजार लोकांना कामावरून काढून टाकले होते. गुगल व्यतिरिक्त मेटा (फेसबुक आणि इंस्टाग्राम), अॅमेझॉन, मायक्रोसॉफ्ट, एसएपी, ओएलएक्स आणि इतर काही मोठ्या कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. त्यामुळे आता जगभरात बेरोजगारीचे प्रमाण देखील वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे.