मुंबई – जागतीक बाजारातून नकारात्मक संदेश कायम असूनही भारतीय शेअर बाजारात मंगळवारी बरीच निवडक खरेदी झाल्यामुळे शेअर बजार निर्देशांक वाढण्यासा मदत झाली. गेल्या तीन दिवसापासून शेअर बाजाराचे निर्देशांक कमी होत होते.
बाजार बंद होताना मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 274 अंकांनी वाढून 61,418 अंकावर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 84 अंकांनी म्हणजे 0.46 टक्क्यांनी वाढून 18,244 अंकावर बंद झाला.
इंडसइंड बॅंक, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन, इन्फोसिस, टेक महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सर्विसेस या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाल्यामुळे निर्देशांकांना आधार मिळाला. भारती एअरटेल, नेस्ले, पावर ग्रीड, एचडीएफसी बॅंक, कोटक महिंद्रा बॅंक या कंपन्यांना आज विक्रीचा मारा सहन करावा लागला.
Gold-Silver Rates : सोने व चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या…आजचे दर
जागतिक बाजारातून आज नकारतामक संकेत आले. जपान चीनमधील शेअर बाजाराचे निर्देशांक वाढले होते तर दक्षिण कोरियातील शेअर बाजाराचे निर्देशांक कमी झाले. युरोपमधील शेअर बाजार निर्देशांक वाढले तर अमेरिकेतील निर्देशांक कमी झाले होते. परदेशी संस्थाकडून गुंतवणूकदारांनी सोमवारी 1,593 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली.