प्रेयसीच्या आत्महत्यानंतर प्रियकरानेही घेतला गळफास; जामखेड तालुक्यातील घटना

जामखेड – तालुक्यातील आपटी या ठिकाणी धक्कादायक घटना घडली असून अल्पवयीन प्रेयसीच्या आत्महत्या नंतर काही वेळातच प्रियकर मुलाने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली. एकाच दिवशी दोघा अल्पवयीन मुलगा व मुलीने आत्महत्या केल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मात्र दोघांनी आत्महत्या का केली या बाबत अद्याप माहिती समजु शकली नाही.

या बाबत समजलेली माहिती अशी की, बुधवार २४ रोजी जामखेड तालुक्यातील आपटी या ठिकाणी मुलीने दुपारी बारा ते एकच्या दरम्यान आपल्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ती माहिती याच गावात रहाणार्‍या तिच्या प्रियकराला समजली.

त्यानंतर आपल्या प्रेयसीने नक्की आत्महत्या केली आहे का? याची खात्री करण्यासाठी तो मुलीच्या घरी गेला. त्या वेळी आपल्या प्रेयसीने आत्महत्या केली असल्याचे समजले. या नंतरसदर मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालय आणण्यात आला.

दरम्यान प्रियकर मुलाने ‘व्हॉटस ऍप’वर मी देखील माझे जीवन संपवत आहे असं स्टेटस ठेवला होता. त्यानंतर त्याने काही तासातच म्हणजे दुपारी तीनच्या दरम्यान शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत दोघांनीही आत्महत्या का केली याची माहिती अद्याप समोर आली नसुन दोघांचे प्रेम संबध होते अशी माहिती समोर आली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.