Jaat Movie Teaser | ‘गदर 2’च्या यशानंतर सनी देओलच्या आगामी चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. यातच आता सनी देओल ‘जाट’ चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 5 डिसेंबर रोजी या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. यात सनी देओल खतरनाक अवतारात दिसणार आहे. यात सनी देओलशिवाय रणदीप हुड्डा, उपेंद्र लिमये आणि विनीत कुमार सिंग यांच्याही भूमिका आहे.
‘जाट’च्या टीझरमध्ये सनी देओलच्या ॲक्शन अवतार दिसत आहे. यात त्याच्या लुकसह संवादांचेही कौतुक केले जात आहे. जाट हा एक मास अॅक्शन थ्रिलर असून त्याबाबत प्रेक्षकांमध्ये बरीच उत्सुकता आहे. जाट हा एक पॅन इंडिया चित्रपट असून त्याचे दिग्दर्शन गोपीचंद मालिनेनी यांनी केले आहे. Jaat Movie Teaser |
View this post on Instagram
या टीझरची सुरुवात ‘शाम के साए में वो आता है और रोशनी से पहले गायब हो जाता है’ अशा डायलॉगने सुरु होते. पुढे हातात भलामोठा पंखा घेऊन सनी देओल गुंडांना लोळवताना दिसतो. अशातच कैदेत असलेला उपेंद्र लिमये शिट्टी वाजवून सनीपाजीला प्रोत्साहन देताना दिसतो. यात सैयामी खेर आणि रेजिना कॅसेंड्रा या अभिनेत्री मुख्य भूमिकेत आहेत. मात्र, चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. Jaat Movie Teaser |
‘जाट’ व्यतिरिक्त सनी देओलकडे प्रीती झिंटासोबत ‘लाहोर 1947’ आणि वरुण धवनसोबत ‘बॉर्डर 2’ चित्रपटात दिसणार आहे. तर ‘अॅनिमल’ आणि ‘मडगाव एक्सप्रेस’नंतर उपेंद्र लिमये पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये दिसणार आहे. Jaat Movie Teaser |
हेही वाचा:
दिल्लीत व्यावसायिकावर गोळीबार ; हल्लेखोरांकडून 8 राऊंड फायरिंग, पोलिसांकडून तपास सुरु