नवी दिल्ली – श्रीलंकेत बुरखाबंदीनंतर भारतातही अशी बंदी करण्याची मागणी काही जणांकडून करण्यात येत आहे. यानंतर रावणाच्या लंकेत जे घडले ते रामाच्या अयोध्येत कधी घडणार? असे म्हणत शिवसेने देखील बुरखाबंदीबाबत भाष्य केले होते. मात्र यावर देशभरात काही ठिकाणी याचे समर्थन तर काही ठिकाणी विरोध दर्शवला जात आहे. तर केरळमधील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी (एमईएस) ने विद्यालयातील मुलींना नकाब परिधान न करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए फजल गफूर यांनी आपल्या जीवाला धोका असल्याचे म्हणत पोलीस तक्रार दाखल केली आहे.
केरळ मधील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीने आधुनिकता आणि धर्म यांचा मिलाप करणे गरजेचे असल्याचे सांगत मुलींना नकाब परिधान न करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर केरळ मधील मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए फजल गफूर यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे फजल गफूर यांनी कोझिकोडे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Kerala: MES President Dr PA Fazal Gafoor has filed a police complaint in Kozhikode alleging that he has received a death threat after Muslim Education Society (MES) issued a circular banning girl students from covering their faces in colleges.
— ANI (@ANI) May 4, 2019