पुणे (प्रतिनिधी) – राज्य माथाडी सल्लागार मंडळ नियुक्तीच्या मागणीसाठी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव 14 डिसेंबरपासून मंबई मंत्रालय येथे करणार होते. मात्र, कामगार व उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या भेटीनंतर ते स्थगित करण्यात आले आहे.
साखर संकुल येथे झालेल्या बैठकीत हे मंडळ नियुक्त केल्याची माहिती वळसे यांनी डॉ. आढाव यांना दिली. त्यानंतर त्यांनी उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला.
त्यावेळी अप्पर कामगार आयुक्त पोळ, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड कामगार युनियनचे सचिव संतोष नांगरे, हमाल पंचायत सचिव गोरख मेंगडे, तोलणार संघटनेचे हनुमंत बहिरट उपस्थित होते.