#PuneCrime | लॉकडाऊन संपल्यावर करणार होते दोघा सराईतांचा गेम, पण……

सहकारनगर पोलिसांनी घातल्या वेळीच बेड्या

पुणे(प्रतिनिधी) – लॉकडाऊन उघडल्यानंतर दोन सराईत गुन्हेगारांचा खून करण्याचा प्लॅन आखण्यात आला होता. हा प्लॅन सराईत गुन्हेगारांच्या टोळीने केला होता. या टोळीचे सदस्य मार्च 2021 मध्ये जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होते. या गुन्हेगारांना माग काढत सहकारनगर पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. त्यांना अटक केल्यामुळे भविष्यातील दोन खूनाच्या घटना टाळता आल्या. या टोळीवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

ऋषिकेश ऊर्फ हुक्‍या श्रीकांत गाडे(26 रा. बिबवेवाडी),, स्वप्निल ऊर्फ पिट्या रतन पवार(21,रा.कात्रज,पुणे ), ऋषिकेश सिध्दार्थ नांदुरे(20,रा,गुजरवाडी रोड,कात्रज,पुणे) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांच्या इतर साथीदारांना अगोदर पकडण्यात आले होते. यातील मुख्य आरोपी ऋषीकेश उर्फ हुक्‍या गाडे याचेवर पुणे शहर,पिंपरी चिंचवड, पुणे ग्रामीण मधील विविध पोलीस स्टेशनमध्ये एकुण 32 गुन्हे दाखल असुन इतर आरोपींवर 5 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत.

सहकारनगर पोलीस स्टेशन येथे नामदेव खंडु जांगट (धंदा नोकरी,रा.बावधन बु.ता मुळशी) यांनी दि.4/3/2021रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्हयाचा तपास सुरु असताना त्यामध्ये पुणे शहर,पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामीणचे रेकॉर्डवरील गुन्हेगार ऋषिकेश ऊर्फ हुक्‍या श्रीकांत गाडे ,स्वप्निल ऊर्फ पिट्या रतन पवार ,ऋषिकेश सिध्दार्थ नांदुरे गौरव ऊर्फ लाल्या सुहास फडणीसअक्षय ऊर्फ पप्पु कैलास गरुड सचिन ऊर्फ घायआण्णा पांडुरंग सोडकर महादेव ऊर्फ म्हाद्या सुरेश नांदुरे चिराग ऊर्फ बाबा, संजय देशमुख , विवेक शेवाळे असे एकुण 9 आरोपी निष्पन्न होवुन ते संघटीतरित्या गुन्हे करीत असल्याचे निदर्शनास आल्याने दाखल गुन्हयात महाराष्ट्र महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका कायदा) कलमांचा अंतर्भाव करण्यात आला.

दाखल गुन्हयात निष्पन्न झालेले वर नमुद आरोपी गुन्हा केल्यानंतर पसार झाले होते. सहकारनगर पोलीस तपास करत असताना ऋषिकेश ऊर्फ हुक्‍या श्रीकांत गाडे, स्वप्निल ऊर्फ पिट्या रतन पवार, ऋषिकेश सिध्दार्थ नांदुरे हे आपली ओळख लपवुन व कुठलाही पुरावा न ठेवता वेगवेगळ्या ठिकाणी लपुन राहत असल्याचे समजले. त्यानुसार त्यांचा तांत्रीक विष्लेशनाचे आधारे व खबऱ्यांमार्फत माग काढुन दि.9/5/2021 रोजी त्यांना माले-पौड, ता.मुळशी व कोल्हापुर येथे सापळा रचुन पकडण्यात आले असुन त्यांना दाखल गुन्हयात अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींकडुन गुन्हयात वापरलेल्या दुचाकी,लोखंडी पालघन नकली पिस्टल असा एकुण 40,000 रु.चा माल हस्तगत करण्यात आला आहे. .
आरोपीनी लॉकडाऊन संपल्यानंतर दोन सराईत गुन्हेगारांचा खुन करण्याचा प्लॅन केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

त्याआगोदर त्यांना अटक केल्याने भविष्यात होणा-या खुनासारख्या गुन्हयांना प्रतिबंध केला आहे. यातील मुख्य आरोपी नामे ऋषिकेश ऊर्फ हुक्‍या श्रीकांत गाडे,स्वप्निल ऊर्फ पिट्या रतन पवार, ऋषिकेश सिध्दार्थ नांदुरे, महादेव ऊर्फ म्हाद्या सुरेश नंदुरे, हे वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या गुन्हयात फरारी होते. ते गुन्हा घडल्यापासुन मिळुन येत नव्हते. तसेच आरोपींकडे दोन चोरीच्या दुचाकी मिळाल्या असुन त्यांचा तपास चालु आहे. दुचाकी चोरीसह नमुद आरोपींकडुन दरोडा, घरफोडी असे आणखी 5 गुन्हे उघडकीस आणले.

 उपायुक्त सागर पाटील, सहा.पोलीस आयुक्त, सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद गंभिरे, पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम(गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर तपास पथकाचे पोलीस उप-निरीक्षक सुधीर घाडगे,पोलीस हवालदार बापु खुटवड, विजय मोरे,पोलीस नाईक प्रकाश मरगजे, सतिष चव्हाण, संदिप ननवरे, भुजंग इंगळे पोलीस शिपाई प्रदिप बेडीस्कर, महेश मंडलिक, किसन चव्हाण, शिवलाल शिंदे यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.