राजकीय नेत्यांवरील ‘हनी ट्रॅप’नंतर “या” अधिकाऱ्यानेही केला रेणू शर्मावर गंभीर आरोप

मुंबई – बलात्काराच्या आरोपामुळे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे अडचणीत सापडले असताना भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसेचे नेते मनिष धुरी यांनी रेणु शर्माविरोधात गंभीर आरोप केल्याने या प्रकरणाला आश्‍चर्यकारक कलाटणी मिळाली आहे. यांच्या तक्रारीची घटना ताजी असतानाच जेट एअरवेजचे अधिकारी रिझवान कुरेशी यांनीही तिच्याविरुद्ध तक्रार केली आहे.

धनंजय मुंडे यांच्याविरोधात बलात्काराचा आरोप करणारी रेणू शर्मा आहे कोण? वाचा सविस्तर

 


…अन्यथा त्यावेळी माझाही धनंजय मुंडे झाला असता – मनसे नेत्याचेही रेणू शर्मावर गंभीर आरोप

मराठी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार,  रेणु शर्माने आपल्याला ब्लॅकमेल केलं असा आरोप त्यांनी केला आहे. त्यांची तक्रार त्यांनी अंबोली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. 

आता पर्यंत या महिलेवर ऐकून चार लोकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून हनी ट्रॅपच्या जाळयात अडकवण्याचा प्रयत्न  केल्याचा आरोप या लोकांनी केला आहे. यामध्ये  धनंजय मुंडे सह, भाजप नेते कृष्णा हेगडे , मनसेचे नेते मनिष धुरी ,  जेट एअरवेजचे अधिकारी रिझवान कुरेशी  यांच्या समावेश आहे. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.