हैदराबाद – भाजप विरोधी आघाडी स्थापन करण्याचे आवाहन तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी केले आहे. केंद्रातील सत्तारुढ भाजपच्या विरोधात असलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करण्यास आपण तयार आहोत, असेही राव यांनी म्हटले आहे.
देशभरातील भाजप विरोधी सर्व पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करून भाजपविरोधात देशव्याप्ती आघाडी स्थापन केली जायला हवी. यासाठी आपण पुढाकार घ्यायला तयार आहोत. या संदर्भात हैदराबाहेत डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात एका मोठ्या परिषदेचे आयोजन केले जाईल, असे राव यांनी काल तेलंगण राष्ट्र समितीच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलताना सांगितले.
तेलंगणमधील दुबक या विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने टीआरएसच्या उमेदवाराचा पराभव करून विजय मिळवला होता. देशातील अन्य राज्यांमध्ये झालेल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकांमध्येही भाजपला मोठे यश मिळाले आहे. त्यानंतर राव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.