पराभवानंतर बंगाल भाजपचे बडे नेते ‘वेगळे’ राजकीय पाऊल उचलण्याच्या तयारीत

बंगाल भाजपमध्ये वाढीला लागली अस्वस्थता

नवी दिल्ली – पश्‍चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत नामुष्कीजनक पीछेहाट झाल्याने प्रदेश भाजपमधील अस्वस्थता वाढीस लागल्याचे चित्र आहे. त्यातून मुकूल रॉय यांच्यासारखे ज्येष्ठ नेतेही वेगळे राजकीय पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
बंगाल निवडणुकीआधी भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग झाले.

मात्र, त्यावरून पक्षातील जुने नेते नाराज असल्याच्या बातम्या वारंवार येत होत्या. बंगालची सत्ता मिळवण्यात भाजपला अपयश आल्यानंतर ती नाराजी उफाळून आल्याचे चित्र आहे. काही नेत्यांनी ती उघड करताना पक्षाची रणनीती आणि तिकीट वाटपाविषयी आक्षेप नोंदवले. 

अशात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे एकेकाळचे विश्‍वासू सहकारी असणारे आणि भाजपला जवळ करणारे रॉयही अस्वस्थ असल्याच्या चर्चा झडू लागल्या आहेत. ते भाजपमधून बाहेर पडतील असे अंदाजही वर्तवले जात आहेत. 

अर्थात, रॉय यांनी स्वत: शनिवारी भाजपमधून बाहेर पडण्याच्या चर्चा फेटाळून लावल्या. भाजपचा सैनिक म्हणून माझा राजकीय लढा सुरूच राहील, असे त्यांनी ट्विटरवरून म्हटले. त्यावर थेट भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी प्रतिक्रिया दिली. रॉय यांची भूमिका भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी अनुकरणीय आहे, असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.