पुणे : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्राणज्योत मालवली आहे. सोमवारी म्हणजेच १५ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ५ वाजून ७ मिनिटांनी बाबासाहेब पुरंदरे यांचे निधन झाल्याची माहिती दीनानाथ मंगशेकर रूग्णालयाच्या प्रशासनाने दिली आहे. बाबासाहेबांवर मागील काही दिवसांपासून उपचार सुरु होते. ते १०० वर्षांचे होते.
दरम्यान, बाबासाहेबांच्या निधानानंतर राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केलीय. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले, नारायण राणे यांच्यासहीत इतर मान्यवरांचाही समावेश आहे.
ज्येष्ठ इतिहास संशोधक शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे जाणे ही अवघ्या महाराष्ट्राची खूप मोठी हानी आहे. बाबासाहेबांना माझी विनम्र श्रद्धांजली.
— Narayan Rane (@MeNarayanRane) November 15, 2021
शंभराव्या वर्षात पदार्पण केलेल्या पद्मविभूषण बाबासाहेबांचे संपूर्ण जीवनच अतिशय प्रेरणादायी आणि नवीन उर्जा देणारे असे होते. आपल्या ओघवत्या वाणीतून छत्रपती शिवराय जिवंत करणाऱ्या बाबासाहेबांचे साहित्य, इतिहास आणि अशा अनेक क्षेत्रांतील योगदान खूप मोठे आहे.
— Narayan Rane (@MeNarayanRane) November 15, 2021
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खद प्रसंगातून सावरण्याचे बळ देवो. ॐ शांती.
— Narayan Rane (@MeNarayanRane) November 15, 2021