नेवासा : सोनई येथील तालुका दूध संघावर वीज चोरी केल्याचा गुन्हा वीज कंपणीकडून दाखल झाल्यानंतर आता आमदार शंकरराव गडाख यांनी विरोधकांकडून ही कारवाई करण्यात आल्याचे सांगत विरोधकांवर खापर फोडण्याचा प्रयत्न करुन वेगळाच ड्रॉमा रचला जात आहे या कारवाईमध्ये भारतीय जनता पार्टीचा कोणताही संबंध नसून जर त्यांना शंका असेल तर शनिदेवाच्या चौथऱ्यावर येवून समोरासमोर चर्चा करावी असे आवाहन भाजपाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी नेवासा फाटा येथे शुक्रवार (दि.३) रोजी हॉटेल आनंद येथे घेतलेल्या पञकार परिषदेत बोलतांना केला.
यावेळी पञकार परिषद बोलतांना माजी आमदार मुरकुटे पुढे म्हणाले की,दुध संघावर वीज चोरीचा गुन्हा विरोधकांकडून दाखल करण्यात आला असल्याचे सांगून विरोधकांकडून सध्या सुडबुद्धीचे राजकारण सुरु असल्याचे सांगून प्रशांत गडाख आजारी असतांनाही ही कारवाई केली गेल्याचा आरोप विरोधकांवर केलेला असल्याचे माध्यमांकडून समजल्यामुळे मी सुध्दा एक गडाखांचा राजकिय विरोधक असून गडाख यांच्यावर झालेल्या कारवाईत माझा आणि भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नाही शनि चौथऱ्यावर येवून समोरासमोर चर्चा करावी केवळ बिनबुडाचे खोटे आरोप आमदार गडाखांनी विरोधकांवर येथून पुढे करु नये आणि केल्यास त्याला उत्तरही देण्यात येईल असा इशाराही या पञकार परिषदेमध्ये माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी आमदार शंकरराव गडाख यांना दिला आहे.
सोनई दुध संघाच्या या प्रकल्पावर वीज महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी धाड घालून ही चोरी पकडलेली आहे त्यामुळे २३ फेब्रुवारीला वीज कंपणीने संबंधितांवर गुन्हा दाखल केलेला आहे या प्रकरणामध्ये आमदार गडाखांनी विरोधकांमुळेच ही कारवाई झाल्याचा आरोप केलेला आहे माञ या दाखल गुन्ह्याचा आणि इतरही गुन्ह्याबाबत भारतीय जनता पार्टीचा कुठलाही संबंध नसून आपण शनि चौथऱ्यावर येवून समोरासमोर चर्चा करण्यास तयार आहोत.
ज्यामुळे गैरसमज होणार नाहीत आणि याबाबींचा खरा उलगडा जनतेला होवून वस्तुस्थिती समोर येईल त्यासाठी माझी शनि चौथऱ्यावर येण्याची तयार आहे माञ विरोधकांवर येथून पुढे खोटे आरोप आमदार गडाखांनी करु नये अन्यथा त्याच पद्धतीने आरोपांना उत्तर देण्यात येणार असल्याची खमकी भूमिका यावेळी आमदार मुरकुटे यांनी घेतली आहे या पञकार परिषदेमध्ये भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी,नेवासा शहराध्यक्ष मनोज पारखे,शरद जाधव, आदिनाथ पटारे व भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.