Cricket Australia : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 5 सामन्यांची कसोटी मालिका होणार असून त्यातील पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून खेळवला जाणार आहे. नोव्हेंबरच्या मध्यातच टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. मालिकेतील शेवटचा सामना 3 ते 7 जानेवारी दरम्यान खेळवला जाईल. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया आशियाई भूमीवर श्रीलंकेविरुद्ध 2 कसोटी सामने आणि 1 वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे, ज्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीनंतर जानेवारीच्या अखेरीस ऑस्ट्रेलिया श्रीलंकेविरुद्ध श्रीलंकेच्या भूमीवर 2 कसोटी सामने खेळणार आहे. याशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर एकदिवसीय सामन्याचेही आयोजन करण्यात आले आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डानेही वेळापत्रक जाहीर केले आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी श्रीलंकेविरुद्धची 2 कसोटी सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियासाठी खूप महत्त्वाची आहे. 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान, तर दुसरा सामना 6 ते 10 फेब्रुवारी दरम्यान खेळवला जाणार आहे. यानंतर 13 फेब्रुवारीला एकमेव एकदिवसीय सामना खेळवला जाईल.
The Australia Men’s National Team will tour Sri Lanka during January–February 2025 to take part in a two-match test series and one ODI game.
The Test series is part of the ICC World Test Championship Cycle of 2023-25.
The Australians will arrive in Sri Lanka on 20th January… pic.twitter.com/6iw2Gmu8YK
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) November 1, 2024
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात 1 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. या मालिकेकडे दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीची तयारी म्हणून पाहतील. यावेळी आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानला दिले आहे.
दरम्यान, साल 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाने शेवटचा श्रीलंकेचा दौरा केला होता, जिथे 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली गेली होती. मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली होती.