मुंबई – अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा वादग्रस्त पती ‘राज कुंद्रा’ याला पोलिसांनी अटक केली होती. अश्लील चित्रपटांच्या निर्मितीच्या व्यवसायात गुंतला असल्याच्या आरोपाखाली त्याला काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. सध्या जेलमध्ये आहे.
View this post on Instagram
दरम्यान, राज कुंद्राच्या अटकेनंतर रातोरात प्रकाश झोतात आलेली अभिनेत्री ‘शर्लिन चोप्रा’ आहे तरी कोण सवाल अनेकांना पडला होता. शर्लिन चोप्राने टिलीव्हिजन रियालिटी शो “बिग बॉस-3′ आणि ‘स्प्लिट्ससविला सीजन -6’ मध्ये सहभाग घेतला होता. ती त्या शोपासून खूपच चर्चेमध्ये आली होती.
View this post on Instagram
तसेच यापूर्वी शर्लिन अभिनेता शाहिद कपूर आणि राणी मुखर्जीसोबत चित्रपट “दिल बोले हड़िप्पा’ या चित्रपटात झळकली होती. सोशल मीडियावर शर्लिनच्या हॉट अदा आणि हॉटनेसचे चाहते खूपच कौतुक करत असतात. फिटनेसबाबत ही आग्रही असलेल्या शर्लिन चोप्राला योगा आणि जिम करायला प्रचंड आवडते.
View this post on Instagram
शर्लिन चोप्रा सोशल मिडीयावर प्रचंड सक्रिय असते. ती नेहमीच आपले फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांशी शेअर करत असते. तिचा मादक आणि बोल्ड लूक चाहत्यांना अक्षरशः हा घायाळ करतो. तिचे बोल्ड फोटो सोशलवर प्रचंड वेगाने व्हायरल होतात.
View this post on Instagram