23 तारखेनंतरच पुढचा निर्णय घेऊ – शरद पवार

नवी दिल्ली – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू हे विरोधी पक्षांच्या भेटीगाठी घेत आहेत. यातच शनिवारी  तेलगु देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्रबाबू नायडू यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीत भेट घेतली.  मिळालेल्या माहितीनुसार, एन. चंद्रबाबू नायडू  आणि अध्यक्ष शरद पवार यांच्यात केवळ 15-20 मिनिटे चर्चा झाली होती.मात्र या भेटीत नेमकी काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट  झाले नसल्यामुळे राजकीय चर्चेला पुन्हा एकदा उधान आलं आहे.

दरम्यान, आज याच भेटी संदर्भात शरद  पवार याना माध्यमांनी प्रश्न विचारले  असता पवार म्हणाले,’आम्ही परिस्थितीचं विश्लेषण करत असून 23 तारखेनंतरच पुढचा निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी व्यक्त केलीय. पवारांच्या या प्रतिक्रियेमुळे अनेक पक्षांची चिंता वाढली आहे. लोकसभेची निवडणूक सुरू होण्याआधी भाजप विरोधात महाआघाडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. मात्र निकालाआधी एकत्र आल्यास सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी बळकटी मिळेल असा चंद्राबाबू नायडूंचा अंदाज आहे. मात्र शरद पवारांच्या प्रतिक्रियेवरून निकाल आल्याशीवाय पवार भूमिका स्पष्ट  करणार नाहीत हे दिसून येतंय.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.